माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- सोमवार ३ जून पासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार १० जून पर्यंत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली या ९ जिल्ह्यात फक्त पूर्व मोसमी गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते.
२-महाराष्ट्रातील उर्वरित २७ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी फक्त किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते.
३-मुंबईसह कोकणात मात्र ढगाळ वातावरणसह पुढील ३ दिवस दमटयुक्त उष्णतेचाही अनुभव येईल.
४-येत्या ४ ते ५ दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो. पण त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धिम्या गतीनेही होऊ शकते असे वाटते. ‘रेमल ‘ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे ला पोहोचला असला तरी, महाराष्ट्रात तो सरासरीच्याच तारखेला म्हणजे मुंबईत १० जून दरम्यानच पोहोचण्याची शक्यता जाणवते.
५- सध्याची एकंदरीत वातावरणीय स्थिती पाहता, पूर्वमोसमी व मान्सूनच्या सरींच्या शक्यतेनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खरीप पेर तयारीसाठी शेतमशागती व त्यानंतर पेरणीसाठीच्या आवश्यक जमीन ओलीसाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण २० जून दरम्यान पर्यंतही कदाचितवाट पहावी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे वाटते. पेरणी तर होणारच आहे, पण सध्याच्या ह्या वातावरणीय पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी अति आत्मविश्वासावर, उगाचच धूळ-पेरणी वा बाठर ओलीवर पेरणीचे धाडस करू नये, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.