नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी शिवारात गोडावून मधून तिघांनी २५ टन स्टील चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे साडे सतरा लाख रूपये किमतीचे लोखंडी सळई भामट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवशंकर,सुरज व राम बोडके अशी स्टील चोरणाºया संशयितांची नावे आहेत. याबाबत पवन सोमनाथ भुतडा (रा.इगतपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. भुतडा यांच्या श्री महालक्ष्मी स्टील कंपनीचे पाथर्डी शिवारात गोडावून आहे. संशयितांनी गेल्या रविवारी (दि.१९) गोडावून मधील १२ मिटर लांबीच्या व ८ ते १६ इंच साईज मधील जीएसडब्ल्यू कंपनीचे सुमारे १७ लाख ५० हजार रूपये किमतीच्या लोखंडी सळई चोरून नेल्या. अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.