नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गापूररोडवरील कॅनलरोड भागात किरकोळ वादातून घरात घुसून शेजारी महिलांनी एका महिलेस बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सहा महिलांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उमा वडगुले, वडगुले यांची मुलगी,रूपाली खालकर,कोमल नागरे,भाग्यश्री बोरगावे,शामली दराडे अशी आपल्या शेजारणीस मारहाण करणा-या संशयित महिलांची नावे आहेत. याबाबत धनश्री मच्छींद्र बोरसे (रा.श्री तिरूमला ओंकार अपा.कॅनलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार व संशयित महिला एकाच सोसायटीतील रहिवासी असून त्यांच्यात किरकोळ वाद आहे.
बुधवारी (दि.२९) सकाळी सोसायटीतील पाणी बंद करण्याच्या कारणातून संशयित महिलांनी बोरसे यांच्याशी वाद घातला. हा वाद हातघाईवर गेल्याने संतप्त महिलांनी घरात घुसून बोरसे यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक सोळंके करीत आहेत.