नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्यांनी शहरातील तिघांना २० लाखांना गंडा घातला आहे. शेअर ट्रेंडिगमध्ये अल्पावधीत चांगल्या प्रकारे फायदा मिळेल असे सांगून ही फसवणूक करण्यात आली. ऑनलाईन झालेल्या या फसवणुकीत पाच महिने उलटूनही गुंतवणुक आणि परतावाची रक्कम पदरात न पडल्याने गुंतवणुकदारांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातीलतीन गुंतवणुकदारांशी भामट्यांनी संपर्क साधला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळया भागात राहणा-या गुंतवणुकदारांशी संपर्क साधून भामट्यांनी शेअर ट्रेंडीग मध्ये गुंतवणुक केल्यास चांगल्या फायद्याचे आमिष दाखविले होते. वेगवेगळया मोबाईल वरून संपर्क साधणा-या भामट्यांनी व्हॅाटसअँप आणि लिंकच्या माध्यमातून तिघे गुंतवणुकदार आपल्या गळाला लावले होते.
दि. २८ ऑक्टोबर २०२३ ते १८ फेब्रवारी दरम्यान गुंतवणुकदारांना विविध खात्यात ऑनलाईन पैसे वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. तिघा गुंतवणुकदारांनी १९ लाख ८३ हजार ८८२ रूपयांची गुंतवणुक करूनही मुद्दलसह परतावा पदरी न पडल्याने गुंतवणुकदारानी भामट्यांशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे भेदरलेल्या गुंतवणुकदारांनी पोलसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीक आहेत.