नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेमप्रकरणात कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत एकाने तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्ष अत्याचार सहन करूनही लग्न ठरल्यानंतर संशयिताने अश्लिल व्हिडीओ आणि फोटो भावी पतीच्या मोबाईलवर पाठविल्याने तरूणीने पोलीसात धाव घेतली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन सातभाई (रा.मुंबईनाका) असे संशयिताचे नाव आहे. २०२२ मध्ये संशयिताने पीडितेशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबध निर्माण केले होते. याकाळात संशयिताने शालिमार भागातील एका लॉजवर तरूणीस घेऊन जात बळजबरीने बलात्कार केला. कालांतराने तरूणीने नकार देताच संशयिताने आई व दोन भावंडाना जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी युवतीवर बलात्कार केला.
या काळात त्याने तरूणीचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढला. युवतीचे लग्न ठरल्याची माहिती मिळताच संशयिताने भावी पतीच्या मोबाईलवर पाठविल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. अधिक तपास निरीक्षक आमणे करीत आहेत.