इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात असलेले अटक वॅारंट रद्द केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, हे वॅारंट रद्द करतांना कोर्टाने त्यांना ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे एक जामीनदार द्यायला सांगितला आहे. २०१३ मधील एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगे यांच्या पुणे कोर्टाने जरांगे पाटील यांच्या अटक वॅारंट जारी केले होते. त्यानंतर जरांगे आज पुणे कोर्टात हजर झाले.
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, जरांगे यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोगा झाल्यानंर त्याचे पैसे दिले नाही. याप्रकरणी न्यायालयामध्ये नाटक कंपनीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये हे अटक वॅारंट जारी करण्यात आले. त्यानंतर जरांगे पाटील हे न्यायालयात हजर झाले. त्यानंतर हे वॅारंट रद्द करण्यात आले. पण, त्यांना ५०० रुपये दंड न्यायालयाने ठोठावला.
या प्रकरणाबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.