इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लासलगाव बाजार समितीत काही काळासाठी कांदा लिलाव बंद पाडल्यामुळे येथील बाजार समितीची कारभार ठप्प झाला होता. शिवसेना नेते शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कांद्यावरील निर्यात पूर्णतः उठवली. मात्र महाराष्ट्रातील कांदा बंदी उठवली नाही असे सांगत हे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकार दुजाभाव करत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे सुरासे यांनी सांगितले. आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त २००० ते सरासरी १६०० रुपयांचा भाव मिळाला.