मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चालत्या बसचा टायर फुटल्याने मोठा आवाज झाल्याने घाबरून जाऊन महिलेने चालत्या बस मधून उडी मारल्याची घटना घडली. यात महिला जखमी झाली आहे. मालेगावहून नाशिककडे जाणाऱ्या बसचा मागील टायर फुटल्याने घाबरून जाऊन चालत्या बस मधून महिलेने उडी मारली. बस उमराणे गावाजवळील उड्डाण पुलाजवळ आली असता ही घटना घडली.
नवरात्र महोत्सवामुळे बसेसना गर्दी असल्यामुळे नांदगाव डेपोची ज्यादा बस ही मालेगावहून नाशिककडे जात होती. बस टायर फुटल्यामुळे
सर्व प्रवासी घाबरून गेले होते. चालकाने गाडी हळू करताच दरवाजा जवळ उभ्या असलेल्या घोटी येथील सुनिता शंकर खतिले (वय ३५) या महिलेने घाबरून दरवाजा उघडून उडी मारली.
यात महिला रस्त्यावर पडल्याने सदर महिलेच्या डोक्याला जोरात मार लागल्याने गंभीर जखमी झाली सदर महिलेस खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.