नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दारू सेवन करण्यासाठी पैसे दिले नाही या कारणातून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना संदिप हॉटेल भागात घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घा-या व त्याचे दोन मित्र अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी गजानन लक्ष्मण रेहंगे (२० रा.वझरे नगर,गोविंदनगर) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. रेहंगे बुधवारी (दि.२९) मुंबईनाका भागात गेला होता. संदिप हॉटेल समोरून तो पायी जात असतांना संशयित टोळक्याने त्याची वाट अडवित दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली. मात्र रेहंगे याने पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याने त्यास शिवीगाळ व दमदाटी करीत लाखाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक बहिरम करीत आहेत.









