माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
मान्सून आज गुरुवार दि. ३० मे २०२४ रोजी केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर आज पोहोचून तेथे तो सक्रिय झाला आहे. यावर्षीची त्याची आगमन भाकित तारीख ३१ मे २०२४ च्या अगोदर एक दिवस तर दरवर्षी असणारी त्याची सरासरी १ जून तारखेच्या अगोदर दोन दिवस तो देशाच्या भू- भागावर प्रवेशित झाला आहे.
मान्सून केरळ राज्याबरोबरच देशाच्या पूर्वोत्तर भागातील ७ राज्यातही त्याने प्रवेश केला आहे.मान्सून केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेंनंतर उर्वरित केरळाचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्विप भागापर्यंत त्याने आज मजल मारली आहे.
मान्सूनचे केरळातील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, शनिवार दि. १ जून ते सोमवार ३ जून जूनपर्यन्त वारा-वावधानासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते. तर तो पर्यंतच्या पुढील २ दिवसात मात्र उष्णतेत अजुन वाढ होण्याची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे एक जूनपर्यन्त, सध्या चालु असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल.
उष्णता सदृश्य लाट -आज व उद्या गुरुवार- शुक्रवारी (३०-३१ मे ला) खान्देश व मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात उष्णता सदृश्य लाट टिकून असेल. तर खान्देशात रात्रीचाही उकाडाही ह्या दोन दोन दिवसात जाणवेल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.