जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रावेर तालुक्यात मोठे वाघोदा येथे कॉलरा आजाराची लागण झाल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हा परिषद चे सर्व संबंधित विभाग प्रमुख व सर्व यंत्रणा यांनी आज वाघोदा येथे संपूर्ण पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करून घेतले, पाणी पुरवठा पाइपलाइन दुरुस्ती सुरू करण्यात आली, आरोग्य विभागामार्फत घरोघर जाऊन रुग्णांबाबत चौकशी केली रुग्णांना ORS बद्दल माहिती देण्यात आले.
तसेच हात धुणे, ORS तयार करणे बाबत प्रात्यक्षिके करून दाखवले. तसेच घराशेजारी परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले
मागील चार दिवसापासून एकही नवीन रुग्ण या गावांमध्ये आढळून आलेला नाही तरी सर्व आरोग्य यंत्रणा यांना योग्य त्या सूचना देऊन कार्यरत ठेवण्यात आलेले आहे
सर्व आरोग्य संस्थांमध्ये औषधी साठा मुबलक उपलब्ध करण्यात आलेला आहे.









