भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील न्यू सातारा रोडवरील मरीमाता मंदिर परिसरात माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
रात्री १० वाजेच्या सुमारास हा गोळीबार झाला. या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. पण, या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यामुळे भुसावळ चांगलेच हादरले.
हे दोघे कारमध्ये बसलेले असतांना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. भुसावळमध्ये गोळीबाराच्या घटना आता नवीन राहिल्या नाही. गुन्हेगारीचे प्रमाणाही येथे आहे. त्यात या घटनेने भर घातली.