इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे येथील कार अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात आता चॅलेंज गेम सुरु झाला आहे. अगोदर दमानिया यांनी अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. त्यानंतर अजित पवारांनी तयारी दाखवून माझी नार्को टेस्ट क्लिअर आली तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही. त्यांनी घरात बसायचं. संन्यास घ्यायचा. आहे का तयारी?, असं आव्हान दिले. त्यानंतर दमानिया यांनी चॅलेंज मंजुर असल्याचे सांगितले. त्यामुळे हा एकमेंकाना चॅलेंज देणारा हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.
अपघातानंतर अजित पवार यांनी पुणे आयुक्तांना फोन केला होता की नाही याचा खुलासा करावा. त्यांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. दमानिया यांचं नार्को टेस्टचं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं आहे. मी नार्को टेस्टला तयार आहे. माझी नार्को टेस्ट क्लिअर आली तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही. त्यांनी घरात बसायचं. संन्यास घ्यायचा. आहे का तयारी?, असं आव्हानच अजित पवार यांनी दिले.
त्यानंतर पुन्हा अंजली दमानिया यांनी चॅलेंज मंजुर आहे असे सांगीतले. त्यांनी अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फ़ोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले, की“ मी गप्प घरी बसावे आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा हे मला पूर्णपणे मान्य. कधी करणार नार्को टेस्ट ते लवकरात लवकर कळवा. नार्को टेस्टचे प्रश्न मी पाठवेन असे सांगितले.