इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांनी राज्यसभेवर निवड केलेल्या प्रफुल्ल पटेल,राज्यसभा सदस्य यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने दि. २७ मे २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्राद्वारे निवडणूक कार्यक्रम घोषित केला आह. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे पद रिक्त झाले असून या पदाचा कालावधी ४ जूलै, २०२८ पर्यंत होता. या रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरवार, दि. ६ जून २०२४ रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, (नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याचा दिनांक), नामनिर्दैशन पत्र दाखल करण्याचा अतिम दिनांक दि.१३ जून, २०२४, गुरवार आहे. दि.१४ जून २०२४, शुक्रवार रोजी नामनिर्दैशन पत्र छाननी करण्यात येईल तर दि.१८ जून, २०२४, मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहील.
मतदानाचा दिनांक २५ जून, २०२४ मंगळवार असून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. दि.२५ जून मंगळवार रोजी सायं.५ वा. मतमोजणी केल्या जाईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, दि. २८ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या निवडणूकीसाठी जितेंद्र भोळे, सचिव, (१) प्रभारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी दिली.