नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार जणांची बदली एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यासाठी ७ हजार रुपयाची लाच घेतांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मनमाड येथील वरीष्ठ लिपीक समाधान हिवाळे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. याअगोदर पाच हजार रुपये फोन पे द्वारे तक्रारदार यांचे मित्राकडून घेऊन बाकी शिल्लक राहिलेले ७ हजार तक्रारदार यांच्याकडून आज रोजी स्वीकारतांना ते रंगेहात पकडले गेले.
या कारवाई बाबत एसीबी दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तक्रारदार व त्याचे तीन मित्र असे यांची बदली एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार असे बारा हजार रुपये असे तक्रारदार यांच्याकडून मागितले होते. बारा हजार पैकी पाच हजार तक्रारदार यांच्या मित्राने काही दिवसापूर्वीच फोन पे केले होते उर्वरित ७००० रुपयांसाठी हिवाळे यांनी तक्रारदार याच्याकडे तगादा लावला होता. आज रोजी तक्रारदार यांनी ला.प्र. वि नाशिक येथे संपर्क साधून तक्रार केली. सदर तक्रारीनंतर ही कारवाई केली करण्यात आली. आज पंचा समक्ष लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यशस्वी सापळा कार्यवाही अहवाल
युनिट- नाशिक
तक्रारदार – पुरुष, वय- 29 वर्ष,
आरोपी – 1) श्री.समाधान त्र्यंबक हिवाळे ,राह- प्लॉट नंबर 15,सारथी अपार्टमेंट, नरहरी नगर, पाथर्डी ,नाशिक
पद- उच्च स्तरीय लिपिक , मनमाड, म. रा. वि.वि. कंपनी वर्ग – 3
लाच मागणी – 12 हजार रुपये
मागणी करून यापुर्वी 5 हजार रुपये फोन पे द्वारे तक्रारदार यांचे मित्राकडून घेऊन बाकी शिल्लक राहिलेले 7 हजार तक्रारदार यांच्याकडून आज रोजी स्वीकारले .
*लाच पडताळणी – दिनांक- 29/05/2024
*लाच स्विकारली* – दिनांक- 29/05/2024 – ७ हजार रुपये.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तक्रारदार व त्याचे तीन मित्र असे यांची बदली एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार असे बारा हजार रुपये असे तक्रारदार यांच्याकडून मागितले होते. बारा हजार पैकी पाच हजार तक्रारदार यांच्या मित्राने काही दिवसापूर्वीच फोन पे केले होते उर्वरित 7000 रुपयांसाठी आलो से यांनी तक्रारदार याच्याकडे तगादा लावला होता. आज रोजी तक्रारदार यांनी ला.प्र. वि नाशिक येथे संपर्क साधून तक्रार केली. सदर तक्रार ची अनुषागणे कारवाई केली असता आलोसे यांना आज रोजी पंच समक्ष लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आलोसे सक्षम. मुख्य अभियंता, म .रा. विं. वितरण विभाग नाशिक परिमंडळ, नाशिक
*सापळा आधिकरी – पोनी. निलिमा सविता केशव डोळस.
*सापळा पथक* पोह. संदीप वनवे, पो.ना. संदीप हांडगे पो. शि. सुरेश चव्हाण