नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट नोटा बाळगणा-या दोन महिलांविरुध्द उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा हजार रुपयाच्या बनावट नोटा ताब्यात घेऊन पोलिसांनी स्वाती देविदास आहिरे रा. सद्गुरु नगर, दसक पंचक, नाशिकरोड व पुजा अनिल कहाने रा. केरु पाटील नगर, जेलरोड, नाशिकरोड यांना ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी यांना मिळालेल्या माहिती नंतर मुक्तीधाम मंदीर परिसरात सापळा रचण्यात आला. येथे पुजा कहाणे ही महिला थांबली होती. यावेळी पुजा कहाणे हिने प्लास्टीकची पिशवी स्वाती अहिरे हिच्याकडे दिली. त्यावेळेस गुंडा विरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी तपासणी केल्यानंतर या बनावट नोटा सापडल्या.
सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर,चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), नाशिक शहर, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे सपोनि सचिन जाधव, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, राजेश सावकार, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड तसेच गुन्हे शाखा युनीट २ चे पो.अंम. बाळु शेळके, प्रकाश भालेराव, शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.