मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शहर शाखेतील एफडी घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी फसवणूक झालेल्या ठेवीदार व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिका-यांना सोबत घेऊन युनियन बँकेच्या मनमाड शाखेतील अधिका-यांची भेट घेऊन अधिका-यांना जाब विचारला.
फसवणूक झालेल्या ठेवीदारांना पैसे तातडीने परत करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्रवारे दिला असून, विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याने ठेवीदारांना बनावट पावत्या देऊन करोडाचा गंडा घातल्याने ठेवीदार हवालदिल झाले असून आता पर्यंत १२५ गुंतवणूकदारांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा साजेसात कोटी रुपयांवर जाऊन पोहचला आहे.