इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेनेत फुट पडल्यानंतर शाब्दीक आरोप – प्रत्यारोप सुरुच असतांना आता त्यावरुन कायदेशीर लढाई सुध्दा आता सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोप केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी तीन दिवसात माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार असल्याते देखील या नोटीसमध्ये म्हटले आहे.
त्यावर संजय राऊत यांनी थेट सोशल मीडियावर हिंदी व इंग्रजीतून उत्तर देतांना म्हटले आहे की, ५० खोके एकदम ओके। इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे। गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है.very intresting and one of the funny political document. अब आयेगा मजा!! जय महाराष्ट्र!