विवेक वाणी, नाशिक
नवरात्रीच्या दिवसात श्री दुर्गा सप्तशती पठणाचे खूप महत्व आहे आणि हे पठण सामुदायिक रित्या झाल्यास एक प्रचंड मोठी अध्यात्मिक शक्ती आपल्या पाठीशी उभी राहत असते, आजच्या विज्ञानाने प्रगत होत असलेल्या जगाला निश्चितच अध्यात्माची जोड आहे आणि म्हणूनच आम्ही आयोजित केला हा सामुदायिक दुर्गा सप्तशती पठणाचा उपक्रम असे प्रतिपादन आपले अध्यक्षीय मनोगत सादर करताना भूषणजी अरुण सोनजे यांनी केले. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था वैद्यकीय प्रतिनिधी फार्मा संघटन आघाडी आयोजित श्री दुर्गा सप्तशती पठण आणि भक्तीसंध्या समयी ते बोलत होते.
आरोग्यविषयक जनजागृती, रक्तदान शिबिर, गरजू रुग्णांना वेळोवेळी लागणारी योग्य ती वैद्यकीय व आर्थिक मदत, प्रत्येकाच्या अडीअडचणीत त्याच्या पाठीमागे संघटित होऊन भक्कमपणे उभे राहणे अशा प्रकारची समाजहितोपयोगी कार्य आमच्या फार्मा संघटनेमार्फत केली जातात आणि विज्ञानाला अध्यात्माची जोड असेल तर ते कार्य अधिक फलदायी ठरते म्हणूनच या वर्षापासून दरवर्षी नवरात्रीत येणाऱ्या प्रथम शुक्रवारी आम्ही सदर उपक्रम राबवणार असल्याची ईच्छा भूषणजी सोनजे यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केली.
उपक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. नंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूषण अरुण सोनजे व पदाधिकारी, समिती प्रमुख जितेंद्र कोठावदे तसेच श्रीमती रत्नमाला ताई राणे, चित्रा ताई कोठावदे सौ.जयश्री इखे, सौ.छाया कोठावदे , सौ. रागिणी धामणे व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. समिती प्रमुख म्हणून जितेंद्रजी कोठावदे यांनी उत्तमरीत्या आपली जबाबदारी सांभाळली. प्रास्तविक सादर करताना त्यांनी हा उपक्रम घेण्यामागील आपली भावना आणि उत्तम नियोजन करण्यासाठी घेतलेली मेहनत याविषयी संवाद साधला.
श्री दुर्गा सप्तशती पाठ का वाचावा याविषयीचे महत्व श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी दशपुते गुरुजी यांनी कथन केले. नंतर पाठ वाचनास सुरुवात करण्यात आली. सौ.जयश्री इखे, सौ.छाया कोठावदे , सौ. रागिणी धामणे यांच्या मार्गदर्शना खाली अत्यंत नियोजनबद्ध आणि एकाच तालासुरात सर्वांनी पाठाचे वाचन केले. यात १०४४ महिलांनी सहभाग नोंदवला. नंतर वाणी कलाकार संघटन प्रस्तुत भक्तीसंध्या हा कार्यक्रम घेण्यात आला. यात चि.दिव्यांशू शिनकर, सौ.अनिता शिरोडे, सौ.प्रज्ञा मेतकर, सौ.नेहा कोठावदे, सौ.पूनम कोतकर यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी संजय चिंचोले, नानासाहेब कोठावदे , शुभम येवले, आशिष जोशी, नितीन अमृतकर, सुजाता शिरोरे, दिलीप बच्छाव, प्रतिभा वाणी, गिरीष महाजन, सतीश येवले ,दिलीप कोठावदे यांचे अनमोल सहकार्य लाभले.आभार संदीप शिरोडे यांनी मानले. निवेदन सौ.प्रतिभा वाणी आणि सौ.रेखा कोतकर यांनी केले. भक्तीसंध्येनंतर आरती, जोगवा , गजर आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुषण अरुण सोनजे , जितेंद्र कोठावदे, मंदार येवला, नितीन नावरकर, अमोल मुसळे, चंद्रकांत येवला, प्रवीण शिरोरे , महेश नानकर,भुषण देविदास सोनजे,अतुल धामणे,भुषण पिंगळे, सचिन वाणी , जयवंत वाणी , शैलेश शिरोडे, चेतन भुरे, हर्षद येवला, किरण पाटकर , स्वप्नील मराठे, राहुल कोठावदे ,राहुल पितृभक्त, संदीप शिरोडे, प्रसाद धांडे ,हितेश मेतकर, रत्नदीप शिरोरे, गणेश चिंचोले, स्वप्नील मालपुरे, विवेक वाणी ,गिरीश महाजन, नाना वाणी ,भुषण अमृतकर आदी प्रबोधन संस्थेच्या सर्व फार्मा संघटन कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.