नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नांदूरगावातील मराठानगर भागात राहणा-या ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज लक्ष्मण शिंदे (रा.मधुगिरी कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मनोज शिंदे यांनी सोमवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच शेजारी शिवनाथ बोराडे यांनी त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.
…….