नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मोटारसायकली चोरीचे प्रकार वाढले असून, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय व ध्रुवनगर भागातून दोन दुचाकी चोरट्यानी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोळशी ता. दिंडोरी येथील शिवीजी विष्णू मुळाणे हे गेल्या शनिवारी (दि.१८) लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय भागात गेले होते. कॉलेजच्या आवारात पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ सीपी ७४२१ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत. दुसरी घटना शिवाजीनगर येथील ध्रुवनगर भागात घडली. सचिन अनिल जोशी (रा.भाग्यलक्ष्मी अपा.) यांची पल्सर एमएच १५ जीटी ६६२६ गेल्या शुक्रवारी (दि.१७) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
शस्त्र घेवून फिरणा-या तरूणावर कारवाई…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चव्हाणमळा भागात धारदार शस्त्र घेवून फिरणा-या तरूणाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत लोखंडी शस्त्र हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आदर्श संतोष गांगुर्डे (२४ रा.पंचशिल कॉलनी,चव्हाण मळा के.जी.मेहता रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शस्त्रधारींची नाव आहे. चव्हाण मळ््यातील के.जी.मेहता हायस्कूल रोड भागात एक तरूण धारदार शस्त्राचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार लोखंडी शस्त्र मिळून आले. याबाबत अंमलदार सुरज गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.