येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –येवला शहरातील विठ्ठल नगर भागात काल संध्याकाळच्या सुमारास गार्डन मध्ये खेळण्यासाठी जात असलेल्या पाच वर्षीय रुद्र समाधान पागीरे या चिमुरड्याला भरधाव वेगाने येणा-या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुद्रला परिसरातील नागरीकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारा दरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने संपुर्ण विठ्ठल नगर भागात शोककळा पसरली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या वाहनाचा शोध घेऊन वाहन चालका विरोधात कठोर कारवाईची मागणी परिसरातील संतप्त नागरीकांनी केली आहे.