इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः कोण कोणत्या कारणाने वाद काढेल व त्यातून तो काय करेल याचा आता नेम नाही. पुण्यात प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली. मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंतनगर येथे हा प्रकार घडला. या घटनेत एक प्रियकर जखमी तर दुसरा गआआड केला आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, सुशील काळे आणि नीलेश शिंदे या दोघांचे एकाच युवतीवर प्रेम आहे. प्रेयसी ही सुशील काळे याच्यावर प्रेम करते. नीलेश आधी त्या युवतीचा प्रियकर होता. आता तो त्रास देत असल्याचे युवतीचे म्हणणे आहे. मध्यरात्री नीलेश हा युवतीला दुचाकीवर भेटायला आला, याची कल्पना तिने सुशील काळे याला दिली. टेल्को रस्त्यावर नीलेश आणि प्रेयसी बोलत थांबले असताना सुशीलने भरधाव वेगातील चारचाकी नीलेशच्या अंगावर घातली. या घटनेत पोलिसांनी सुशीलला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.