नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेने वेगवेगळ्या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारत मुख्याध्यापकसह अनेकांचे निलंबन केले आहे. तर काही प्रकरणात चौकशी व नोटीस पाठवल्या आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचाय विभाग व बांधका विभागातील कर्मचारी व अधिका-यांवर ही कारवाई केली आहे.
शिक्षण विभाग –
१) प्रकरण : दिंडोरी तालुक्यातील २ सहविचार सभेत हाणामारी करतांनाची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती.
कारवाई : निलंबन
२) प्रकरण : जिल्हा परिषद शाळा वाडीवर्हे ता. इगतपुरी येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. १०/०४/२०२४ भेट दिली असता शाळेत कुणीही हजर नव्हते.
कारवाई : मुख्याध्यापक यांचे निलंबन
आरोग्य विभाग-
१) प्रकरण : वडनेर भैरव प्राथमिक आरोग्य केंद्र ता. चांदवड येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजाविषयी वारंवार तक्रारी होत होत्या, त्यानुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित प्राथमिक केंद्रातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पथक पाठवले असता वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असतांना त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न कळवता गैरहजर असल्याचे आढळले. कारवाई: यासंदर्भात चौकशी अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत विभाग-
१) प्रकरण : ग्रामपंचायत विभागातील प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले ग्रामसेवक यांचे तक्रार करण्यात आली होती.
कारवाई : त्यानुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर ग्रामसेवक यांना पंचायत समिती चांदवड येथे मूळ आस्थापनेवर कार्यमुक्त करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले.
२) वळवाडी ता. मालेगाव येथील ग्रामसेवक यांनी यापूर्वी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत नागझरी/ हाताणे येथील दप्तर तपासणीसाठी दिलेले नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत निमशेवाडी येथील लेखापरीक्षण केलेले नाही.
कारवाई : निलंबन
बांधकाम विभाग –
१) प्रकरण : सुरगाणा पंचायत समिती येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना दि. ०९.०५.२०२४ रोजी ४० हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. कारवाई : निलंबन
२) प्रकरण : बागलाण पंचायत समिती येथील उपअभियंता यांचे कामकाजाबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार प्राप्त झाली होती.
निलंबन : यासंदर्भात संबंधित उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस ही कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग २ यांनी बजावली आहे.