इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
नवी दिल्ली येथील विशेष न्यायालाने नागपुरमधील मेसर्स बीएस इस्पात लिमिटेड या खासगी कंपनीला आणि तिचे दोन संचालक मोहन अग्रवाल आणि राकेश अग्रवाल यांना मार्की मांगली कोळसा वाटपाच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.
कोळसा ब्लॉकसाठी अर्ज सादर करताना आणि कोळसा खाण वाटपाच्या अर्जावर प्रक्रिया करताना आरोपींनी कंपनीच्या अस्तित्वाबाबत खोटी माहिती सादर केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण ब्युरोने ३१ मार्च २०१५ रोजी गुन्हा नोंदवला होता. तीन लाख टन प्रतिवर्ष क्षमतेच्या प्रस्तावित स्पंज आयर्न प्लांटमध्ये बंदिस्त वापरासाठी कोळसा ब्लॉक वाटप करण्यात आला होता. कंपनीने कोळशाचा वापर ज्या कामांसाठी केला होता त्यापेक्षा इतर कामांसाठी गैरव्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला.
तपास पूर्ण झाल्यानंतर २४ जुलै २०१८ रोजी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. कोर्टाने खटल्यानंतर आरोपींना दोषी ठरवले आणि शिक्षेवरील युक्तिवाद उद्या २८ मे रोजी होणार आहेत.