इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात घडलेल्या अग्रवाल प्रकरणात रोजच नव्या बाबी समोर येत आहेत. एका मोठ्या बापाच्या मुलाला वाचवायला कित्येक अधिकाऱ्यांनी,लोकप्रतिनिधींनी आपलं इमान त्या रात्री विकले,हे समजून घेताना अक्षरशः मनाचा संताप होतोय अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत व्यक्त केला.4
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे. आरोपीचे ब्लड सँपल डॉ.अजय तावरे आणि श्रीहरी हरणोर यांनी चक्क कचऱ्यात फेकले.त्याऐवजी दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीचे ब्लड सँपल या लोकांनी पोलिसांना दिले. इतकंच नाही तर याचा रिपोर्ट द्यायला ४-५ दिवसांचा वेळ लावला. एरवी २ तासात मिळणारे सँपल रिपोर्टला इतका वेळ का लागत असावा..?
बाकी या डॉक्टरांना ससून हॉस्पिटलची पोस्टिंग मिळावी यासाठी अपघात झाला त्यादिवशी जातीने लक्ष घालणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता अशी देखील माहिती समोर येत आहे. हा तोच डॉक्टर आहे जो ललित पाटील ड्रग्स प्रकरणात देखील संशयाच्या छायेखाली होता.
पुणे पोलिस, ससूनचे डॉक्टर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे मिळून एका बड्या बापाच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.आणि तर जितके प्रयत्न करत आहेत तितकेच अजून जनते समोर नागडे होत आहेत. हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाणा आणि चीड आणणारा आहे.