शनिवार, ऑक्टोबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वीज खंडित झाल्यास तक्रार नोंदविण्यासाठी हे विविध पर्याय वापरा…

मे 27, 2024 | 6:35 pm
in स्थानिक बातम्या
0
mahavitarn

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये व झाल्यास तात्काळ सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सातत्याने रात्रंदिवस कार्यरत असतात, मात्र महावितरणची सर्वत्र असलेली विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक विविध कारणांमुळे यंत्रणेमध्ये व्यत्यय येत असतो बिघाड मोठा असल्यास वेळ लागू शकतो त्यामुळे दुरुस्ती काळात विजेवरील अवलंबित्वाची व वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव असून वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार नोंदविण्यासाठी विविध पर्यायाचा ग्राहकांनी वापर करावा आणि संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी महावितरणकडून पावसाळा पुर्वी विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे माहे एप्रिल व मे महिन्यामध्ये केली जातात. विद्युत यंत्रणांच्या दुरुस्तीचे वा देखभालीचे काम करायचे असल्यास वाहिनीचा किंवा त्या भागाचा वीजपुरवठा खंडित करावाच लागतोच, त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती व देखभालीची कामे केली जातात. त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये वीज पुरवठा खंडित राहण्याचे प्रमाण जास्त वाटते. देखभालीचे कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून तसेच भूमिगत वाहिन्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक दोषामुळे यंत्रणेचे नुकसान होत असते. तशातच विद्युत वाहिनीमध्ये किंवा उपकेंद्रामध्ये बिघाड निर्माण झाल्यास आणि मोठा बिघाड असल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा जास्त वेळ वीज पुरवठा बंद राहू नये यासाठी त्या भागात प्रथम पर्यायी विद्युत यंत्रणेतून तात्पुरता वीज पुरवठा सुरू केला जातो. सर्वप्रथम बिघाड झालेले उपकरण, वाहिनी किंवा उपकेंद्र सर्वप्रथम बिघाड शोधून तत्परतेने चालू करण्याचा प्रयत्न केला जातो त्यात काही अडथळा निर्माण झाल्यास इतरही पर्याय वापरून तात्काळ सुरळीत करण्यासाठी कार्यरत असतात. सोबतच वीज पुरवठा खंडित होवून सुरळीत होण्यास वेळ लागल्यास महावितरणचे सुध्दा आर्थिक नुकसान होत असते.

अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर, उपकेंद्रातील कर्मचारी नजीकच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फिडर चालू केला जातो. जर फिडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित केले जाते. बिघाड शोधणे तेवढे सोपे नसते. वारा, पावसाची किंवा अंधाराची पर्वा न करता ही शोधमोहीम राबविली जाते. बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात. त्यानंतर अभियंता आणि जनमित्र दुरुस्तीचे कार्य करीत असतात. ग्राहकांनी त्यांना वारंवार वैयक्तिक संपर्क केल्याने दुरुस्तीचे कार्यात संथगती व अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास थोडावेळ वाट बघून त्यानंतरच महावितरण संपर्क साधून तक्रारीची नोंदणी करा. त्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.

कृपया हे करा

  • मोबाईल अँप :- प्लेस्टोअर, विंडोज स्टोअर व अँपस्टोअरहून महावितरणचे मोबाईल अँप डाऊनलोड करता येते. या अँपमध्ये वीजबिलाची माहिती, तक्रार नोंदणी आदी सुविधा सहजपणे उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा.
  • ऊर्जा चॅटबॉट : आपण मोबाईल अँप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळाचा वापर केला तर आपल्याला उजव्या कोपऱ्यात ऊर्जा चॅटबॉटचे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित चिन्ह दिसेल. याच्या माध्यमातून आपला मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक नोंदवून तक्रार नोंदवण्यासह इतर सुविधांचा वापर करु शकता.
  • तक्रार कशी नोंदवाल :- विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन ०२२-५०८९७१०० या क्रमांकाला मिस कॉल केल्यानंतर सुद्धा वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदवली जाते किंवा NOPOWER <ग्राहक क्र> हा संदेश ९९३०३९९३०३ या नंबरवर पाठवा. आलेल्या तक्रारी विशिष्ट अशा संगणकीय प्रणालीमार्फत संबंधित जनमित्र व अभियंत्यामार्फत पोहोचवल्या जातात. तसेच तक्रारींची सोडवणूक झाली की नाही याची खातरजमा मध्यवर्ती सेवा केंद्रातून केली जाते. यामुळे ग्राहकाची तक्रार योग्य व्यक्तीपर्यंत व वेळेत पोहोचवून त्या वेळेत सोडविल्या जातात.
  • अपडेट्स मोबाईलवर :- मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजपुरवठा व वीजबिल व इतर माहिती SMS वर पाठविली जाते. त्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी MREG_<12 अंकीग्राहक क्रमांक> (उदा. MREG 123456789012) असा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ क्रमांकावर पाठवावा.
    कुठल्याही कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव असून अखंडित, सुरळीत व सुरक्षित सेवेसाठी यंत्रणा सज्ज असून तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा बंद झाल्यास ग्राहकांनी या काळात संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

कृपया हे टाळा

  • वीज पुरवठा बंद झाल्यानंतर गोंधळून न जाता थोडा वेळ वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट बघा. तात्काळ वीज केंद्र किंवा वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क न साधता संयम राखा.
  • जास्त काळ वीज सेवा खंडित झाली तर संगणकीकृत ग्राहक सेवा केंद्राला संपर्क साधा. वीज कर्मचारी, अभियंते यावेळी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. संगणकीकृत ग्राहक सेवा केंद्र ग्राहकांच्या तक्रारी कालबद्ध प्रमाणात विविध स्तरांवर पाठपुरावा करून आपली तक्रार निर्गमीत करण्याचा उत्तम पर्याय आहे.

भूमिगत वाहिनीमध्ये नुकताच आकस्मिक बिघाड
इंदिरानगर भागातील शिवाजीवाडी या विद्युत उपकेंद्राला १३२ केव्ही टाकळी विद्युत उपकेंद्र येथून वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही भूमिगत वाहिनीमध्ये नुकताच आकस्मिक बिघाड निर्माण झाल्याने शिवाजी वाडी उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद पडला होता. भूमिगत विद्युत यंत्रणा रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असल्याने बिघाड शोधून सोबत दुरुस्ती करण्यास जास्त वेळ लागला, त्यामुळे ग्राहकांना विजेअभावी त्रास सहन करावा लागला. यावेळी विद्युत उपकेंद्रातील काही वाहिन्या पर्यायी वाहिनीमधून वीज पुरवठा घेऊन सुरु करण्यात आला. मात्र तरीही या उपकेंद्राचा विद्युत भार जास्त असल्याने सर्व वीज पुरवठा सुरु करता आला नाही. त्याकरिता महावितरणने या भागात अतिरिक्त विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी तांत्रिकदृष्ट्या यॊग्य असलेली वडाळा येथील खुली जागेची मागणी महापालिकेकड़े करण्यात आलेली आहे. त्यासाठी महापालिकेने सदर जागेसाठी जवळपास २० लाख रुपये वार्षिक मूल्यांकन द्यावे लागणार असल्याचे कळविले आहे. मात्र महावितरण शासकीय कंपनी असल्याने सदर जागा नाममात्र दराने मिळण्याची विनंती महावितरणने महापालिकेकडे केली आहे. सदर जागेच्या उपलब्धतेनुसार विद्युत उपकेंद्राचे कार्य पूर्ण झाल्यानंतर या भागातील विद्युत भार विभाजित होण्यास मदत होऊन अखंडित व सुरळीत ग्राहक सेवा देण्यास मदत होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाडला युनियन बँक घोटाळा..आमदार सुहास कांदे यांच्या तक्रारीवरुन बँकेवर गुन्हा दाखल

Next Post

आरबीआयाने ICICI बँकला १ कोटी तर येस बँकेला ठोठावला इतक्या लाखाचा दंड

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
rbi 11

आरबीआयाने ICICI बँकला १ कोटी तर येस बँकेला ठोठावला इतक्या लाखाचा दंड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011