नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरोग्य शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर नेतृत्व देण्याची भारताची क्षमता असून त्या दृष्टीने निर्धाराने पाऊले टाकली पाहिजे असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात MedEduIndia@2047 च्या अुनषंगाने आयोजित ‘वन नेशन, वन करिक्युलम, वन आऊटकम’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले.
या परिषदेस एम.जी.एम. युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे कुलगुरु डॉ. शशांक दळवी, आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युर्निव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. अरुण जामकर, कृष्णा विश्व विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. प्रविण शिणगारे, राजस्थान आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर भंडारी, महात्मा गांधी युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड टेक्नोलॉजीचे कुलगुरु डॉ. अचल गुलाटी, मुंबईचे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास शर्मा, हिंदुजा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश सुपे, भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, विद्यापीठाच्या मेडिकल एज्युकेशन अॅण्ड टेक्नोलॉजीच्या चेअर पर्सन डॉ. पायल बन्सल, प्रवरा रुरल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य एअर मार्शल (निवृत्त) डॉ. राजीव भलवार, डॉ. एम.जी.आर. मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ. के. नारायणस्वामी, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे संल्लागार डॉ. सिध्दार्थ रामजी, विद्यापीठाच्या मेडिकल विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विठ्ठल धडके मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. नरहरी कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, कोविडमध्ये भारताने अतिशय कौतुकास्पद पध्दतीने आलेल्या आपत्तीचा सामना केला. मोठी लोकसंख्या असून देखील जगातील विकसित देशांना देखील जे जमले नाही ते भारताने करुन दाखविले. यावरुनच सर्वांच्या सहकार्याने एकत्रित येऊन आपत्तीचा सामना करण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे असे सिध्द झाले आहे मात्र त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह सर्वांनी एकत्रित येणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मा. पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेनुसार आरोग्य शिक्षणाची स्थिती भक्कम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे. यासाठी आरोग्य शिक्षणातील सर्वच विद्याशाखांचे पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचा गाभा परिपूर्ण असावा जेणेकरुन आपत्कालीन स्थितीत आरोग्य समस्यांचे निराकरण करणे सुकर होईल. यासाठी आरोग्य शिक्षणातील शिक्षक व प्राध्यापक यांचे अद्ययावत ज्ञानासाठी वेळोवेळी प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. प्रति एक हजार व्यक्तींमागे सेवा देणाÚया डॉक्टरांची संख्या वाढावी जेणेकरुन सर्वांना सुलभरित्या आरोग्य सेवा पुरविणे शक्य होईल. आरोग्य शिक्षणात संशोधनाचा टक्का वाढावा यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात संशोधनावर आधारित उपक्रमांची संख्या वाढवावी अश्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, ’कोविड’ रोगाच्या प्रादुर्भावात जगाने अनुभवलेल्या आरोग्य विषयक समस्यांचा बारकाईने परिक्षण करुन यात सुधारणा करण्याची गरज आहे. आरोग्य शिक्षण भविष्यात आणखी उज्वल व्हावे यासाठी पायाभूत घटकांचे विस्तारिकरण होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतूदींचा अवलंब करण्यासाठी स्थानिक पातळीवर मूलभूत घटकांचे सक्षमीकरण गरजेचे आहे. आरोग्य शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरुन ’स्वस्थ भारत’च्या अंतर्गत मोठया प्रमाणात मदत उपलब्ध होते, याबाबत मार्गदर्शन आणि योग्य प्रणालींचा अवलंब होणे गरजेचे आहे. आयुष विभागातंर्गत विविध उपचार पध्दती आहेत त्याचा अवलंब होण्यासाठी प्रचार व प्रसाराची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आरोग्य शिक्षणात जागतिक दर्जावर टिकणारी उत्तम शिक्षण पध्दतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. याकरीता शिक्षक व प्राध्यापक यांना संबंधित क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानासाठी प्रशिक्षण व कार्यशाळा गरजेच्या आहेत. विद्यापीठाव्दारे संलग्नित महाविद्यालय व शिक्षणसंस्था यामध्ये ई-लायब्ररीचा समावेश असावा जेणेकरुन विद्यार्थ्यांना अभ्यासाकरीता पुस्तके त्वरीत उपलब्ध होतील. वैद्यकीय क्षेत्राबरोबर आयुर्वेद, युनानी, नर्सिंग, होमिओपॅथी व अन्य शाखांचे प्राबल्य वाढविण्यासाठी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. विद्यापीठ हे उच्चतम स्तरावरुन शैक्षणिक धोरणाविषयी नेतृत्व करते त्यासाठी आरोग्य क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांचा सहभाग महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युर्निव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणात शैक्षणिक गुणवत्ता महत्वपूर्ण असून भारतीय डॉक्टरांना परदेशात आरोग्य सेवेसाठी मोठया प्रमाणात संधी आहेत. योग, नॅचरोपॅथी आणि आयुर्वेद शास्त्रात इंटरनॅशनल कोर्सेस सुरु करुन या संदर्भात संशोधन होणे गरजेचे असून त्याला जागतिक स्तरावर मोठया प्रमाणात मागणी आहे. ग्लोबल रिसर्च कोलॅबरेशनसाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. परदेशी वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना इंटरशीप करण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिल्यास आरोग्य शिक्षणाचा विस्तार होण्यासाठी मदत होईल असे त्यांनी सांगितले.
या परिषदेत हिंदुजा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश सुपे, सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युर्निव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. अरुण जामकर, भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, प्रवरा रुरल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य एअर मार्शल (निवृत्त) डॉ. राजीव भलवार, डॉ. एम.जी.आर. मेडिकल युनिव्हसिटीचे डॉ. के. नारायणस्वामी, कृष्णा विश्व विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. प्रविण शिनगारे, राष्ट्रीय निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल ऑनलाईन उपस्थित होते तसेच या राष्ट्रीय परिषदेत हिंदुजा हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश सुपे ’डिसिफरिंग द नॅशनल एज्युकेशन पॉलीसी इन द मेडिकल एज्युकेशन कटेक्स्ट’ विषयावर मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास शर्मा चर्चेत सहभागी झाले होते. विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युर्निव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. अरुण जामकर इंटरनल हार्मोनायझेशन इंटरनॅशनलायझेशन ऑफ मेडिकल एज्युकेशन विषयावर मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत राजस्थान आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर भंडारी चर्चेत सहभागी झाले होते.
पुणे भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी प्रॉस्पेक्टीक अॅनालिसिस ऑफ असेसमेंट अॅण्ड रेटींग ऑफ मेडिकल कॉलेजेस बाय द क्लॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया संदर्भात मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत महात्मा गांधी युनिर्व्हसिटी ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीचे कुलगुरु डॉ. अचल गुलाटी चर्चेत सहभागी झाले होते. प्रवरा रुरल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य एअर मार्शल (निवृत्त) डॉ. राजीव भलवार इंटिरग्रंेटींग ऑफ इकोसिस्टम फॉर क्वालिटी हेल्थकेअर डिलिवरी विषयावर मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत आरोग्य विद्यापीठाच्या मेडिकल एज्युकेशन अॅण्ड टेक्नोलॉजीच्या चेअर पर्सन डॉ. पायल बन्सल चर्चेत सहभागी झाल्या होत्या. डॉ. एम.जी.आर. मेडिकल युनिव्हसिटीचे डॉ. के. नारायणस्वामी हॉनिंग द कॉम्पेटेंसी ऑफ मेडिकल एज्युकेशन विषयावर मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत एम.जी.एम. युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे कुलगुरु डॉ. शशांक दळवी चेचर्चेत सहभागी झाले. कृष्णा विश्व विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. प्रविण शिनगारे नेव्हिगेटींग द फ्युचर चॅलेंजेस इन मेडिकल एज्युकेशन विषयावर मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत डॉ. सिध्दार्थ रामजी चर्चेत सहभागी झाले. तसेच केंद्र सरकराचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल अनफोल्डींग द जर्नी ऑफ मेडिकल एज्युकेशन विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले.
MedEduIndia@2047 परिषदेचे समापन विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी केले. शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले तसेच सहायक प्राध्यापिका डॉ. सुप्रिया पालवे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाच्या वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व परिषदेकरीता गठीत विविध समिती सदस्यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या परिषदेस आरोग्य क्षेत्रातील साठपेक्षा अधिक अधिकारी व अभ्यागत उपस्थित होते.