नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात तारवालानगर व सिडको भागातून दोन दुचाकी चोरट्यानी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. अजय सोमनाथ निकम (रा.्अष्टविनायक चौक,सावतानगर) यांनी फिर्याद दिली आहे. निकम यांची स्कुटी एमएच १५ बीएल ३३०१ गेल्या २८ मार्च रोजी औदूंबर चौकातील सुभाषचंद्र बोस गार्डन भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत.
दुस-या घटनेत तारवालानगर येथील शुभम अनिल नवले (रा.रूई अपा.मारूती मंदिराजवळ,लामखेडेमळा) यांची पल्सर एमएच १७ बीएफ ९११० गेल्या बुधवारी (दि.१५) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.