इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या दोन डॅाक्टरांना अटक करण्यात आली आहे. रक्ताचे नमूने बदलण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॅा. श्रीहरी हळनोर, डॅा. अजय तावरे यांना अटक केली आहे. ससून रुग्णालयातील सीएमओ डॅा. श्रीहरी हननोर यांनी रक्ताचे नमूने पहिल्यांदा घेतले. त्यासाठी त्याला तीन लाख मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
या अटकेनंतर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सांगितले की, या डॅाक्टरांवर ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससून मध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती .मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता.
असो, हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. ते आता हळू हळू जगासमोर येतील.अत्यंत घृणास्पद प्रकार…आरोपीचे ओरिजनल Blood Sample ससुनच्या डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलेले आहेत. पुणेकरांनो आपण जी लढाई लढतोय ती कुणा एकाच्या विरोधात नाही तर या बरबटलेल्या सिस्टीमच्या विरोधात आहे.