इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्रायल पॅलेस्टिनचा संघर्ष सुरु असतांना भारताने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी ६.५ टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू भारताने पाठवल्या आहेत. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टीत भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मानवतावादी दृष्टीकोनातून भारताने ही मदत पाठवली आहे. येथील नागरिकांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत आहे, तर औषधांचा साठाही अपुरा आहे.
त्यामुळे रविवारी पॅलेस्टाईनला भाराने मदतीचा हात दिला. भारताने संघर्षात अडकलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांसाठी जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत. भारताने पॅलेस्टिनी नागरिकांच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट करत दिली आहे.
ट्वीटमध्ये म्हटले आहे, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी जवळपास ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन IAF C-17 उड्डाण इजिप्तमधील अल-अरिश विमानतळाकडे रवाना झाले. या साहित्यात जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता, पाणी शुद्धीकरण गोळ्या यासह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.