पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला असून पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज हा निकाल जाहीर केला.
विभाग निहाय निकालात कोकण विभागानं ९९.०१ टक्के घेत बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल असून तो ९४.७३ आहे. मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. या निकाल एकूण ७२ विषयांपैकी १८ विषयांचा १०० टक्के लागला आहे. दहावीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल बघात येतील. त्याचप्रमाणे निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करता येणार आहेत.
विभागनिहाय निकाल – पुणे – ९६.४४, नागपूर – ९४.७३, छत्रपती संभाजीनगर – ९५.१९, मुंबई- ९५.८३, कोल्हापूर – ९७.४५
अमरावती – ९५.५८, नाशिक- ९५.२८, लातूर – ९५.२७ ,कोकण – ९९.०१ टक्के आहे.
दहावीचा निकाल असा बघा
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in