रविवार, ऑगस्ट 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कान चित्रपट महोत्सवात भारताची ऐतिहासिक कामगिरी…इतके मिळाले पुरस्कार

by Gautam Sancheti
मे 26, 2024 | 11:12 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 105


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारताची कामगिरी अभूतपूर्व ठरली असून २ चित्रपट निर्माते, एक अभिनेत्री आणि एका सिनेमॅटोग्राफरने जगातील या आघाडीच्या चित्रपट महोत्सवात सर्वोच्च पुरस्कार पटकावले आहेत. भरभराटीला येत असलेल्या चित्रपट उद्योगासह चित्रपट निर्मिती करणारे सर्वात मोठे राष्ट्र म्हणून ओळख असताना, भारतीय चित्रपट निर्मात्यांनी या वर्षीच्या कान्समध्ये वाखाणण्याजोगी प्रशंसा मिळवली आहे.

पायल कपाडियाचा दोन परिचारिकांच्या जीवनाभोवती केंद्रित असलेल्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला ३० वर्षांत पहिल्यांदाच या महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार पाल्मे डी’ओरसाठी नामांकन मिळाले होते . कपाडिया यांच्या चित्रपटाने ग्रँड प्रिक्स श्रेणीत दुसरे स्थान मिळवले. या विजयासह एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेची माजी विद्यार्थीनी पायल कपाडिया, या प्रतिष्ठित पुरस्काराला गवसणी घालणारी पहिली भारतीय ठरली आहे. शाजी एन करुण यांच्या ‘स्वाहम’ ने सर्वोच्च सन्मानाच्या स्पर्धेत धडक दिल्यानंतर 30 वर्षांनी भारताला मजल मारता आली आहे.

पायलच्या चित्रपटाला भारत आणि फ्रान्स दरम्यान स्वाक्षरीकृत झालेल्या दृक-श्राव्य करारांतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिकृत इंडो-फ्रेंच सह-निर्मितीचा दर्जा दिला होता. मंत्रालयाने महाराष्ट्रात (रत्नागिरी आणि मुंबई) चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगीही दिली होती. अधिकृत सह-निर्मितीसाठी भारत सरकारच्या प्रोत्साहन योजनेअंतर्गत सह-निर्मिती पात्रता खर्चाच्या 30% एवढी रक्कम या चित्रपटाला हंगामी मान्यतेद्वारे प्राप्त झाली होती.

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांनी कन्नड लोककथेवर आधारित “सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो” या 15 मिनिटांच्या लघुपटासाठी ला सिनेफ विभागात प्रथम पारितोषिक पटकावले. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा हा चित्रपट भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या दूरचित्रवाणी विभागाच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमात निर्मित केला जातो ज्यात दिग्दर्शन, इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी या वेगवेगळ्या अभ्यासक्रमातील चार विद्यार्थ्यांनी वर्षाच्या शेवटी समन्वयित अभ्यासक्रम म्हणून एका प्रकल्पासाठी एकत्र काम केले.

2022 मध्ये FTII मध्ये दाखल होण्यापूर्वी, चिदानंद एस नाईक यांची 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) 75 सर्जनशील नवचित्रकर्मीं (क्रिएटिव्ह माईंड्स) पैकी एक म्हणून निवड झाली होती. 75 क्रिएटिव्ह माईंड्स हा माहिती-प्रसारण मंत्रालयाचा, चित्रपट क्षेत्रातील नवोदीत तरुण कलाकार हुडकून त्यांना प्रोत्साहन देणारा एक उपक्रम आहे. भारतात जन्मलेल्या मानसी माहेश्वरीच्या बनीहूड या ॲनिमेटेड चित्रपटाला, ला सिनेफ निवड विभागात तिसरे पारितोषिक मिळाले आहे, ही बाब इथे लक्षात घेणे महत्वपूर्ण ठरते.

या महोत्सवात जगप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. भारतात प्रदर्शित झाल्याच्या 48 वर्षानंतर, नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया (NFDC-NFAI माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत) या भारताच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये जतन केलेला आणि फिल्म हेरिटेज फाउंडेशनने पुनर्संचयित केलेला बेनेगल यांचा मंथन चित्रपट कान महोत्सवात क्लासिक विभागात प्रदर्शित करण्यात आला.

भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या जातिवंत कामासाठी परिचित असणारे प्रसिद्ध चलतचित्रणकार (सिनेमॅटोग्राफर) संतोष सिवन हे त्यांच्या “चित्रपट विषयक कारकीर्द आणि कामाच्या असामान्य दर्जेदार गुणवत्तेसाठी” 2024 कान्स चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित पियरे अँजेनीक्स ट्रिब्यूट पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले आशियाई चित्रकर्मी ठरले. ‘अनसर्टन रिगार्ड’ श्रेणीत, ‘द शेमलेस’ मधील आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकत पहिली भारतीय ठरलेल्या अनसूया सेनगुप्ता,या आणखी एका चित्रकर्मीने ‌ कान्समध्ये इतिहास घडवला.

एफटीआयआयचा माजी विद्यार्थी असलेला एक चित्रपट निर्माता मैसम अली हा देखील कान्समध्ये स्वतंत्रपणे चमकला. त्याचा “इन रिट्रीट” हा चित्रपट एसीआयडी कान्स साइडबार या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. 1993 मध्ये स्थापन झाल्यापासून असोसिएशन फॉर द डिफ्यूजन ऑफ इंडिपेंडंट सिनेमा द्वारा संचालित विभागात पहिल्यांदाच भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांसाठी हे एक ऐतिहासिक वर्ष ठरत असताना, पायल कपाडिया, संतोष सिवन, मैसम अली आणि चिदानंद एस नाईक यांसारखे आपले माजी विद्यार्थी कान्समध्ये चमकल्यामुळे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया-FTII या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेकडे आपले कर्तृत्व साजरे करण्याचे खास कारण आहे. एफटीआयआय ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे आणि केंद्र सरकारच्या आर्थिक पाठबळावर एक संस्था (सोसायटी) म्हणून काम करते.

एक खिडकी मंजुरी ही एकाच ठिकाणी सर्व सुविधांची एकत्रित उपलब्धता, विविध देशांसोबत संयुक्त निर्मिती, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या स्वायत्त संस्थांद्वारे चित्रपटक्षेत्र विषयक प्रशिक्षणाला पाठबळ, या माध्यमातून चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. यामुळे भारताला जगाचे प्रमुख चित्रपट विषयक आशय केंद्र (कंटेंट हब) म्हणून प्रस्थापित करण्याचे बहुआयामी प्रयत्न राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक परिणाम साधत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आज प्रत्येक कामात यश, जाणून घ्या, सोमवार, २७ मेचे राशिभविष्य

Next Post

आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची टीम ठरली किंग…अभिनेता शाहरुख खानने खेळाडूंचे केले अभिनंदन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी झटपट लाभाचा मार्ग तूर्तास टाळावा, जाणून घ्या, रविवार, २४ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 23, 2025
IMG 20250823 WA0414 1
स्थानिक बातम्या

‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे येवल्यात स्पेशल स्क्रिनिंग…मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

ऑगस्ट 23, 2025
GzBKF1PXoAA7lsG
महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरे यांनी घेतली मंत्री आशिष शेलार यांची भेट…पत्रकार परिषद घेऊन सांगितले भेटीमागील कारण

ऑगस्ट 23, 2025
GzCFBWUa8AAKrj5
मुख्य बातमी

राज्यभरातून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या…मुख्यमंत्र्यांनीच दिली ही माहिती

ऑगस्ट 23, 2025
post
संमिश्र वार्ता

अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित…हे आहे कारण

ऑगस्ट 23, 2025
Untitled 38
महत्त्वाच्या बातम्या

ईडीची मोठी कारवाई…आमदाराला अटक, १२ कोटीची रोख रक्कम व ६ कोटीचे दागिने जप्त

ऑगस्ट 23, 2025
WhatsApp Image 2025 08 22 at 18.17.36
संमिश्र वार्ता

विठू माझा लेकुरवाळा’ने श्रोते मंत्रमुग्ध…२५० बालकलावंतांचा भक्तीचा जागर, रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

ऑगस्ट 23, 2025
प्रातिनिधिक फोटो
इतर

अल्पवयीन मुलीस परिचीताने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

ऑगस्ट 23, 2025
Next Post
GOheFViawAAuXc5

आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची टीम ठरली किंग…अभिनेता शाहरुख खानने खेळाडूंचे केले अभिनंदन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011