इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्या येथे श्री राम मंदिर ट्रस्टने राम मंदिर परिसरात मोबाईल फोनवर पूर्ण बंदी घातली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्रशासनासोबत ट्रस्टची बैठक झाली. प्रवाशांची सुरक्षा आणि सोय लक्षात घेऊन प्रशासन आणि ट्रस्टने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.
यावेळी त्यांनी सर्व भक्तांना विनंती आहे की मोबाईल मंदिर परिसरात आणून नका,सहकार्य करा जेणेकरून कोणालाही कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, आमच्याकडे मोबाईल ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे.