इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंब्रा वाय जंक्शन येथे बायपासच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे शनिवारी एक भीषण अपघात झाला. संरक्षक कठडा नसल्यामुळे एक ट्रक बायपासवरून सर्व्हीस रोडवर कोसळला आणि या अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
या अपघातानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हा यांनी या दिरंगाईसाठी कोण जबाबदार आहे? एमएमआरडीएने वेळेत काम पूर्ण का केले नाही? संरक्षक कठडे बांधण्याची जबाबदारी काँट्रेक्टरची असताना त्याने या कामाकडे दुर्लक्ष का केले? खालील भाग वर्दळीचा असूनही कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. स्थानिकांनी काँट्रेक्टरला अनेकवेळा सांगूनदेखील काँट्रेक्टरने मस्तवालपणा करीत दुर्लक्ष करून जवळपास वर्ष घालविले. आज त्याच ठिकाणी अपघात झाला.
या अपघातास जबाबदार असलेले एमएमआरडीएचे अधिकारी आणि संबधित काँट्रेक्टर यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा तसेच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा, आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.