इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
साकीनाका, मुंबई येथे राहणाऱ्या व खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका इसमाला आरोपीने स्वतः पोलीस अधिकारी, आयकर अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून त्या इसमाच्या नावे फेडेक्स कुरियर आले असून बँक खात्यातून अनधिकृत ट्रान्झॅक्शन झाल्याचे सांगितले व अटक करण्याचे भय दाखवून रुपये ३९ लाख ८८ हजार ५२६ ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
फसवणूक लक्षात येताच फिर्यादीने तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क केला व या गुन्ह्यात फसवणुक झालेली संपूर्ण रक्कम वाचवण्यात १९३० हेल्पलाईन पथक, गुन्हे शाखा, मुंबई यांना यश आले.
गुन्हे शाखा, मुंबई सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की तुमच्यासोबत सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकाशी संपर्क साधा.