नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरातील वेगवेगळया भागात उघड्यावर जुगार खेळणा-या नऊ जुगारींवर पोलीसांनी कारवाई केली. शुक्रवारी (दि.२४) केलेल्या या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंबड व म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगीक वसाहतीतील जाधव संकुल भागात काही तरूण उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास छापा टाकण्यात आला असता कैलास बाळू मिस्तरी,प्रकाश प्रल्हाद बेहरा, शंकर जासींदर बेलदार,गोपाल बाबुराव कुमावत,प्रकाश बारकू पाटील, अनिल आनंदा बोरसे व ज्ञानेश्वर भगवान बोरसे आदी तुळजा भवानी मंंदिराच्या समोरील गल्लीत उघड्यावर पत्यांच्या कॅटवर जुगार खेळतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ७०० रूपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस शिपाई दिनेश नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. दुसरी कारवाई म्हसरूळ गावात करण्यात आली. म्हसरूळ गावातील राजवाडा भागात असलेल्या पत्र्याच्या गाळ््यामध्ये उमेश शेळके,मयुर साळवे व सौरभ कदम (रा.चाणक्यपूरी,म्हसरूळ म.बाद लिंकरोड) आदी श्रीदेवी बाजार नावनाच मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. या कारवाईत ५६० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.