नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी शुक्रवारी (दि.२४) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
शिंदे ता.जि.नाशिक येथील निलेश योगिनाथ सदगिर (३० रा.तुळजा भवानी लॉन्स मागे) या युवकाने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरतील बाथरूमच्या खिडकीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास मुंबईनाका भागातील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरी घटना भगूर येथे घडली. किरण भास्कर कामत (५६ रा. राजाराम भदाणे यांची चाळ, वेताळबाबा रोड भगूर) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील खोलीत पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत राजाराम भदाणे यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.