इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप आहे. या घटनेत अगोदर निंबध लिहण्याची शिक्षा आरोपीला करण्यात आली होती. त्यामुळे हाच धागा पकडून भव्य राज्यस्तरीय खुली निंबध स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या संतापाला वाट मोकळी करुन देण्याची संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या निंबध स्पर्धेची माहिती पोस्ट करतांना काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे की, व्यवस्थेची चिड येत असेल तर घरी बसून संताप करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवा..जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा असे आवाहन केले आहे. तर बघा कशी आहे स्पर्धा…