इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेले ६ दिवस सर्व पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर काल अखेर या प्रकरणातील २ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आला आहे. मयत अनिश व अश्विनी या दोन्ही मृतांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या मृत्यूपश्चात “डिल” करत तपासात अक्षम्य चुका करणाऱ्या व हे प्रकरण पद्धतशीर दाबण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुमारे पाच ते सहा अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकाऱ्यांचा निलंबन होणे हे या प्रकरणातील पहिले सकारात्मक पाऊल असल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी काही प्रश्नही उपस्थितीत केले आहे.
ते म्हणाले की, अगदी शुक्रवारी सकाळी १२ वाजता घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणे पोलिसांनी योग्य तपास केला असे ठणकावून सांगणाऱ्या पुणे पोलीस कमिशनर यांना अचानक हे दोन पोलीस अधिकारी दोषी कसे सापडले…? याचे देखील आश्चर्य वाटते.
त्यांनी त्यांचा हा जो वसुलीचा खेळ सुरू केला आहे, तो इतरत्र कुठे जाऊन करावा. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत पुणे पोलीस दलाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या कमिशनर यांच्या बदली करावी या मागणीवर मी ठाम असल्याचे ते म्हणाले.