नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील उत्तमनगर भागात राहणा-या १८ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पियुश गुलाब पाटील (रा.शिवपूरी चौक,उत्तमनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. पियूष पाटील याने गुरूवारी (दि.२३) रात्री अज्ञात कारणातून घरात कुणी नसतांना राहत्या घरातील किचन मध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक आवारे करीत आहेत.
मटका जुगार खेळणा-यावर कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील जत्रा चौक भागात अंक आकड्यावर मटका जुगार खेळणा-या व खेळविणा-या दोघांवर पोलीसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक मदन साळवे (३७ रा.अंबिका स्वीट मागे,जगतापवाडी सातपूर) व सुभाष नारायण अडांगळे (३२ रा.संगम बिर्याणी जवळ,कोणार्क नगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. याबाबत हवालदार विकास कंदिलकर यांनी फिर्याद दिली आहे. जत्रा चौकाजवळील हॉटेल नटखट भागात उघड्यावर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२३) दुपारी पथकाने धाव घेतली असता संशयित अंक आकड्यावर पैसे लावून डे श्रीदेवी नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळूून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे ५४५ रूपये किमतीची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार काटकर करीत आहेत.
……