नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवदर्शनासाठी शहरात दाखल झालेल्या परप्रांतीय महिलेच्या पर्स मधील सोन्याचा नेकलेस भामट्यांनी हातोहात लांबविला. ही घटना गोदाघाट परिसरातील कपालेश्वर मंदिरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजया लक्ष्मण कोलीपाका (रा.पदमनगर ता.सिरसिल्ला राजन्ना राज्य तेलंगणा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोलीपाका कुटूंबिय गुरूवारी (दि.२३) देवदर्शनासाठी शहरात दाखल झाले होते. गोदाघाटावर फेरफटका मारून कुटूंबिय कपालेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेले असता ही घटना घडली. मंदिरात भाविकांची गर्दी असल्याने कोलीपाका कुटूंबिय दर्शन रांगेत असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या गळ््यातील पर्स मधील सुमारे ७० हजार रूपये किमतीचा सोन्याचा नेकलेस हातोहात लांबविला. अधिक तपास पोलीस नाईक लोणारे करीत आहेत.
……..
गळयातील शॉर्ट पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील शॉर्ट पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घडना हिरावाडीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना नामदेव निकम (६२ रा. जेम्स स्कूल जवळ प्रशांतदादा हिरे नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकम गुरूवारी (दि.२८) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. घर परिसरातील जेम्स स्कूल जवळून त्या रस्त्याने पायी जात असताना समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोन्याची शॉॅट पोत हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.