इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे येथील अपघात प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. कर्तव्यात कसूल केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. या अधिका-यांनी अपघाताबाबत वायरलेस कंट्रोल रूमला माहिती न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
१९ मे रोजी भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. तर कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याची बालसुधार गृहात रवाणगी करण्यात आली आहे.