इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज औद्योगिकलगत असलेल्या वडगाव कोल्हाटी येथे लग्न करून देत नाही तसेच वाटण्या करून देत नाही या कारणाने दोन मुलांनी वडिलांवर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत वडील संपत वाहूळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ दिवसांपूर्वी वडील आणि मुलांमध्ये वाद झाला. त्यानंतर ही घटना घडली. प्रकाश आणि पोपट वाहुल या दोन मुलांनी रागाच्या भरात वडिलांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात मुलांचे संपत वाहूळ हे गंभीर जखमी झाले. मोठा मुलगा प्रकाशने चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. स्वतःला वाचवण्यासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने त्यांना पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वार केले.
आरडाओरड ऐकून संपत यांचे भाऊ रामनाथ वाहुल, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस आले. आता हा वाचला तर गोळी घालून मारून टाकू, अशी धमकी मुलांनी दिली. संपत यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.