नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावती न देता माती वाहतूक करण्यासाठी अतिरिक्त २५ हजाराच्या लाचेची मागणी करणा-या पारोळा येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते या एसबीच्या जाळ्यात अडकल्या. त्यांच्या विरुध्द पारोळा पोलीस स्टेशन, धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा विटकामाचा व्यवसाय असून त्यांनी आलोसे यांचेकडे गौण खनिजाच्या रॉयल्टीपोटी २५ हजार रुपये रक्कम कडे जमा केली होती. सदर रक्कमेची पावती न देता माती वाहतूक करण्यासाठी आलोसे ह्या अतिरिक्त २५ हजार लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता तलाठी यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे तलाठी वर्षा काकुस्ते यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन, धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
लाचेची मागणी सापळा कारवाई*
▶️ युनिट – ला.प्र.वि. धुळे.
▶️ तक्रारदार- पुरुष, 43 वर्ष, जिल्हा- जळगाव
▶️ आलोसे – वर्षा रमेश काकुस्ते, वय- 38 वर्ष, तलाठी ( सजा शिवरे दिगर), रा. पी.डब्ल्यू.डी. शासकीय निवासस्थान, पारोळा बस स्थानकाच्या समोर, पारोळा – जळगाव रोड, जि. जळगाव ( वर्ग -3)
▶️ लाचेची मागणी-
दि. 13.12.2023 रोजी 25,000 /-रुपये .
▶️ लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचा विटकामाचा व्यवसाय असून त्यांनी आलोसे यांचेकडे गौण खनिजाच्या रॉयल्टीपोटी 25000/- रुपये रक्कम कडे जमा केली होती. सदर रक्कमेची पावती न देता माती वाहतूक करण्यासाठी आलोसे ह्या अतिरिक्त 25,000/- लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 25000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे आलोसे यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन, धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी
मा. जिल्हाधिकारी, जळगाव.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ परिवेक्षण अधिकारी-
श्री. अभिषेक पाटील
पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
मो.न.8888881449
▶️ सापळा तपासी अधिकारी
रूपाली खांडवी,
पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे
मो.नं. 8379961020.
▶️ सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम
पो. शि. प्रशांत बागुल
चालक पो. शि. बडगुजर
सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे .