नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाव पातळीवर पक्ष उभारणीस गती देऊन आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणा असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी पक्षाच्या मालेगाव तालुकाध्यक्षपदी किशोर इंगळे, मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी सतीश पवार, मालेगाव पूर्व तालुका अध्यक्षपदी रतन हलवर तर कार्याध्यक्षपदी महेंद्र साळुंखे यांची नियुक्ती केली आहे. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक येथे नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत पक्षाची बांधणी करावी. यासाठी समाजातील सर्व समाज बांधवाना सोबत घेऊन काम करावं. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रीयपणे काम करावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, डॉ.जयंत पवार यांची भाषणे झाली.
यावेळी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, डॉ.जयंत पवार, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, समाधान जेजुरकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, संकेत निमसे, राजेंद्र जाधव, विजय पवार, विनोद शेलार, चेतन देवरे, प्रशांत महाजन, राजेंद्र सोनवणे, प्रदीप खैरनार, केतन इंगळे, रोहित बोरसे, जितेंद्र पाटील, तुषार खैरनार, मनोज सूर्यवंशी, बाजीराव सरोदे, दिपक अहिरे, धर्मराज शिंदे, माधवराव हलवर, अशोक हलवर, सखाराम दुकळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.