इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
छत्तीसगडमध्ये एसओजी, डीआरजी, सीआरपीएफ, बीएसएफ आणि कोब्रा कमांडोसह सुमारे एक हजार जवानांचे पथक नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन चालवत आहे. अलीकडेच कांकेर, बस्तर आणि विजापूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकींत सुरक्षा दलाचे काही जवान जखमी झाले आहेत.
नारायणपूर-विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या दंतेवाडा येथे नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील डीआरजी आणि बस्तर फायटरसह एसटीएफच्या पथकांनी शोध मोहीम राबवली.