नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड येथे चांदवड-मनमाड रस्त्यावर रात्री भरधाव कार व दुचाकीची जोरदार धडक झाल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे जागीच ठार झाले आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.
हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समोर आले नाही. या अपघानानंतर स्थानिकांनी मदत केली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे यांच्या अपघातामुळे रेल्वे कर्माचा-यांनी शोक व्यक्त केला आहे.