इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये पोलिसांनी ८०० कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. ८० किलो वजनाचे हे कोकन आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी या कारवाई बाबत माहिती देतांना सांगितले की, गांधीधाम पोलिसांनी ८० किलो कोकेन जप्त केले असून ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे. या यशाबद्दल त्यांनी डीजीपी आणि गांधीधाम पोलिसांचे अभिनंदन केले.
या ड्रग्ज बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी समुद्रकिनारी शोध मोहिम सुरु केली. त्यावेळी पोलिसांच्या भीतीने आरोपींनी अंमली पदार्थ समुद्रातच टाकून घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
८० किलोंचे ड्रग्स समुद्री किनारी पडलले होते. पोलिसांनी ते जप्त केले आहे.याअगोदही गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहे. तस्करी करणा-यांचे मोठे रॅकेट आहे. आता पोलिस या रॅकेटचा तपास करत आहे.
Police raid in Gujarat, drugs worth 800 crore seized