नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरा बुधवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड व मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
कामटवाडे येथील दिपक मधुकर गाडेकर (४० रा.पवारबाबा चाळ) यांनी बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत महेश गाडेकर यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत. दुसरी घटना वडाळा पाथर्डी रोडवरील शिवाजीवाडी भागात घडली.
रवी रमेश भोये (३३) यांनी बुधवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात झोळीच्या दोरीने गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ दिपक भोये यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक गाडे करीत आहेत.